सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
गेल्या एक महिन्या पूर्वी शिरकोली ग्रामपंचायत मधील ठाणगाव येथील संजय हिरवे यांचा पुतण्या व रघुनाथ हिरवे यांचा मुलगा याचे गावात लागलेल्या वणव्यात दोन्ही पाय गंभीर भाजले होते.
थोडे दिवस उपचार करून उपचाराचा खर्च परवडेना म्हणून त्ते मुलाला घरी घेऊन आले,हे समजल्यावर काहि दानशूर व्यक्ती घरी गेल्या घरी गेल्यावर मुलाची परिस्थिती पाहिल्यावर जेष्ठ इतिहास संशोधक दत्ताभाऊ नलावडे यांच्या बरोबर चर्चा केली यानंतर सोशल मिडियावर मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते अनेक लोकांनी फोन करून आर्थिक मदत केली. व नसरपुर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यासाठी सांगितले..गेल्या ४ जून ला कुणाल ला ऍडमिट केले आज कोणताही खर्च न घेता सिध्दीविनायक हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. डिंबळे यांनी कुणालच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. कुणालच्या पायावर विनमोबदला सर्जरी केली. कुणालला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला.. दीड महिन्याचा कुणाल व त्याच्या वडिलांचा जेवणाचा खर्च युवा नेते धनेशभाऊ डिंबळे यांनी उचलला.. त्याच सोबत घिसर गावचे महेश धिंडले व सरपंच अमोल पडवळ यांचे हे मोठे योगदान लाभले.दानशुरांनी मदत केल्यामुळे कुणालचे प्राण वाचले. कळत नकळत सर्व जणांनी केलेल्या मदती मूळे कुणाल चे पाय वाचले तो या कठीण परिस्थितीतून बाहेर पडला ..
COMMENTS