सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे : मिनल कांबळे
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यत असणा-या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहचवा असे प्रतिपादन आमदार जगदीश मुळीक यांनी वेल्हे येथे आयोजित भाजपाच्या बैठकीत केले.
आगामी विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकास्तरावर बैठका सुरु असुन वेल्हे येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेल्हे येथील देशमाने हॅाल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत राजगड तालुका भाजप मंडल प्रभारी म्हणून आमदार जगदीश मुळीक बोलत होते.बोलताना ते पुढे म्हणाले कि महाराष्ट्र शासनाच्या योजना खुप प्रभावी आणि चांगल्या आहेत.लोकांना याबद्दल सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे.तसेच लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.सामान्य व्यक्तीला शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ देण्यासाठी पदाधिका-यांनी प्रयत्न करावेत व शासनाच्या योजना तळागाळापर्यत पोहचवाव्या असे प्रतिपादन यावेळी मुळीक यांनी केले.
तर तालुकाध्यक्ष आनंद देशमाने तालुक्याचा आढावा यांनी दिला यानंतर निलेशजी कुलकर्णी यांनी केंद्रीय बजेटचे वाचन करुन माहीती दिली
जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी संघटनेच्या कामाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी नाना साबणे ,पोपट पासलकर प्रदेश पदाधिकारी,मारुती कुरपे ,कैलास बिरामने , प्रमोद पासलकर ,सतीश लिम्हन , बाबा पिसाळ, भाऊ मरगळे,राहुल रणखांबे
, विशाल शिळीमकर, तात्या कुलकर्णी ,अशोक मोहिते , निवृत्ती सुतार,विलास शिळीमकर , प्रमोद भोरेकर, राहुल उत्तरकर,हेमंत पुरोहित, योगेश जेधे,सचिन केदारी,रोहिणी देशमाने,कविताताई
महाडिक,सागर सुतार,विलास हांडे उपस्थित होते.