सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे : मिनल कांबळे
भारतीय जनता पार्टीचे वेल्हे (राजगड) तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी
सामुहिक राजीनामे देणार असल्याचे पदाधिका-यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना पदाधिकारी म्हणाले कि भारतीय जनता पार्टी वेल्हे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांना तालुकाध्यपद दिल्याने पदाधिका-यामध्ये नाराजी होती. तरीदेखील पदाधिका-यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन एकदिलाने काम केले.अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी पक्षाच्या योजनांचा स्वतः साठी पुरेपुर फायदा करून घेऊन
भरपूर आर्थिक लाभ मिळवला होता व सरकार बदलल्यानंतर त्यांनी लगेच पक्ष सोडला व सरकार असलेल्या पक्षात प्रवेश केला.परिणामी पक्षाला त्यांचा काहीही फायदा झाला नाही उलत नुकसानच झाले.
त्यांनी मात्र पक्षाचा फायदा स्वतः साठी करून घेऊन निघून गेले होते.तालुक्यात गेली ३० वर्षापासून पक्षाचे निष्ठेने काम करणारे अनुभवी कार्यकर्ते आहेत.संख्येने कमी व आपआपल्या गावात एकटे का होईना गेली
३० वर्षापासून पक्षाचे काम इमानदारी ने कट्टर पणे करीत आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी सारख्या पक्षाच्या कडव्या कार्यकर्त्या विरोधात लढत आहेत हे
माहीत असूनही पक्षाने त्याचा काहीही विचार न करता पुर्णपणे दुर्लक्ष करूा देशमाने यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद दिले आहे.अध्यक्षांच्या कालावधीत दोन निवडणुका झाल्या यामध्ये त्यांनी
पक्षाच्या विरोधात काम केले आहे.तसेच अध्यक्ष स्वत ठेकेदारी करत असुन स्वताच्या फायद्यासाठी अध्यक्षपदाचा वापर करीत आहेत,पदाधिका-यांची कधीही बैठक घेतली नाही किंवा
जनतेच्या हितांचे कोणतेही काम केलेले नाही ,आनंद देशमाने यांच्या फसव्या व पक्षविरोधी कामाकाजाबद्दल
वरीष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.परंतु वरिष्ठ पातळीवर याबाबत कोणतेही दखल घेतली नाही त्यामुळे तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य तसेच तालुका कार्यकारीणी सदस्य,विविध आघाड्या,सर्व मोर्चाचे पदाधिकारी,शक्ती प्रमुख,बुथ प्रमुख व इतर पदाधिकारी हे सर्व सामुहिक राजीनामे देणार आहेत.
याबाबातचे पत्र महाराष्ट्र राज्याचे तंत्र आणि उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी किरण दगडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांना देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
आनंद देशमाने यांनी दोन्ही वेळेस पक्षाचा फक्त स्वःताच्या फायद्या साठी वापर करून घेतला असून आजही त्यांचा तोच कार्यक्रम चालू आहे. परिणामी पक्षामध्ये त्यांनी दोन्ही कार्यकाळामध्ये आज पर्यन्त एकही कार्यकर्ता जोडला नसून पक्षाला त्यांचा काहीही
फायदा झालेला नसून उलट नुकसान झालेले आहे. तालुक्यातील आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या मनमानी,फसव्या व पक्षविरोधी कामकाजाला
वैतागलो असून आम्ही आमच्या पदांचा सामुहीक राजीनामा राजु रेणुसे,रविंद्र दसवडकर,प्रशांत शिळीमकर
दिनकर मळेकर,सुनिल जागडे,देविदास हनमघर,सचिन भरम,अविनाश भोसले,शुभम बेलदरे, विठ्ठल घोरे,विनोद आधवडे,सुहास शेंडकर,पवन शिंदे,आदींनी सामुहिक राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे
अशी माहिती पत्रकार परिषेदत देण्यात आली.यावेळी राजु रेणुसे,रविंद्र दसवडकर,प्रशांत शिळीमकर
दिनकर मळेकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत तालुका अध्यक्ष आनंद देशमाने म्हणाले कि पदाधिका-यांनी केलेले सर्व आरोप राजकीय आकसापोटी केलेले आहेत,तर काही पदाधिकारी आपल्या स्वार्थासाठी हे आरोप काम करीत आहेत.
तालुक्यात भाजपाचे काम चांगले आहे.सगळया पदाधिका-यांचे एकमत नाही.निवेदनासोबत असलेल्या यादीमध्ये काही भाजपाचे पदाधिकारी नाहीत.तर वेल्हे कार्यकारीणीमधील सदस्यांमध्ये अर्धे सदस्यांची
माझ्या अध्यक्ष पदाबाबत काहीही म्हणणे नाही.