Javali News l धनंजय गोरे l बहिणींचे हाल..बेहाल :/उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात बहिणींची तुफान गर्दी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम----- 
जावली : धनंजय गोरे 
महाराष्ट्रात नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली असून या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या योजनेची अंमलबजावणी ०१जुलै पासून सुरू झाली असून यासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांची सेतू कार्यालयात तुफान गर्दी होत आहे. यासोबतच झेरॉक्स दुकानांत सुद्धा महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
         महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून,या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो व उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक असून या कागदपत्रांपैकी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सध्या जावली तालुक्यातील मेढा सेतू कार्यालयात महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी सकाळपासूनच मेढा तहसील कार्यालयाच्या आवारात महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे गावकामगार तलाठी यांच्याकडे सुद्धा महिलांची रीघ मावत नव्हती. यासोबतच बाजारपेठेतील झेरॉक्स दुकाने सुद्धा महिलांच्या गर्दीने गजबजून गेली होती.
To Top