सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील संत गोरोबा काका पालखी मधील वारक-यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात
आले.राजगड तालुक्यातील संत गोरोबा काका पालखी दिंडी किल्ले राजगडापासुन निघते तालुक्यातील
मोठ्या प्रमाणात वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात.मंजाई आसनी येथे ही पालखी
आल्यानंतर या ठिकाणी वारक-यांचे शिवार फाऊंडेशनकडुन स्वागत करण्यात आले.त्यानंतर येथील
वारक-यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवार फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ इंगुळकर,प्रमोद गुप्ताभरत काटकर,स्वप्निल इंगुळकर, अजय पुरोहीत,सरपंच मुकुंद मराठे,दत्ता पानसरे,विश्वास दामगुडे,विकास कांबळे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.