Rajgad News l मिनल कांबळे l चेलाडी ते वेल्हे मुख्य रस्त्यावरील खड्डे ताबडतोब भरा अन्यथा : वेल्हे युवक काँग्रेसकडून इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
चेलाडी ते वेल्हे मुख्य रस्त्यावरील खड्डे ताबडतोब भरा अन्यथा युवक कॅाग्रेसकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असुन याबाबतचे निवेदन युवक कॅाग्रेसकडुन सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले असल्याची माहिती युवक कॅाग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवराज शेंडकर यांनी दिली.
           य़ाबाबत अधिक माहिती देताना शिवराज शेंडकर म्हणाले कि  चेलाडी ते वेल्हे मुख्य रस्त्यावरील खड्डे खड्डे पडले असुन ऐन पावसाळ्यामध्ये नसरापूर या ठिकाणी चालू असलेले काँक्रिटीकरणाचे काम  सुरु असुन  या कामामुळे कायमच वाहतुक कोंडी होत आहे त्य़ामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.रस्त्यावर काही ठिकाणी पावसाचे पाणी येत आहे त्या ठिकाणी गटर काढा व रस्त्यावरील खड्डे त्वरित भरा तसेच नसरापूर या ठिकाणचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
         काम आठ दिवसांमध्ये न केल्यास राजगड (वेल्हे) तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी राजगड (वेल्हे) तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज  शेंडकर उपाध्यक्ष गणेश जागडे सरचिटणीस सागर मळेकर , भोर विधानसभा कार्याध्यक्ष निलेश पवार,निगडे गावचे 
उपसरपंच संभाजी खुटवड, दीपक धुमाळ उपस्थित होते.
To Top