सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे ; मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील २१ गावात अद्याप शासकीय धान्य पोहचले नाही,वाहतुक ठेकेदारावर कारवाई करण्याची भाजप कडुन मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष आनंद देशमाने यांनी दिली आहे,
याबाबत या निवेदनात असे म्हटले आहे की
तालुक्यामध्ये आत्तापर्यंत 21 गावांना अजून रेशनिंगचं धान्य पोहोचलेलं नाही नियमाने हे रेशनिंगचं धान्य हे आधीच्या महिन्यातच दुकानला पोहच करणे आवश्यक असते आणि साधारण तीन चार तारखेला त्याच वाटप सुरू करायचं असते, सात तारीख ही अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा करायचा असतो आणि त्या सात तारखेच्या अन्नसुरक्षा दिनासाठी प्रत्येक दुकानला धान्य पोहोचणे गरजेचे असते तालुक्यात वाहतूक मुळता उशिरा सुरू करण्यात आलेली आहे आणि अजून 21 गाव या वाहतुकीपासून वंचित आहेत यामध्ये गोडाऊनचा अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने वेळ मिळेल तसं धान्याचे वाटप केलं जात आहे नियमाने चुकीच आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपार होत आहे त्याचबरोबर या वाहतुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे लोकांना गोरगरीब जनतेला याच्यासाठी रखडावे लागते आज 18 तारीख आहे तरीसुद्धा धान्य पोहोचलेलं नाही, त्याच्यापुढे ते दुकानांला जाणार शेवटमध्ये दुकानदार याचा गैरफायदा अशा पद्धतीने घेतात की त्या लोकांना ते धान्य दिलं जात नाही आणि महिना संपला की धान्य संपल असं सांगितलं जातं,त्याचबरोबर धान्याच्या वजनाबाबत अनेक दुकानदारांच्या पण तक्रारी आहेत की धान्याचे वजन हे गोडाऊन मधनं कमी दिलं जातं आणि याच्या संगनमताने ते धान्य वाहतूक ठेकेदारांनी अधिकारी परस्पर याची विक्री करतात,
याबाबत तहसीलदार यांना भाजपकडून निवेदन देऊन या ठेकेदारावरती कारवाई व्हावी व योग्य पद्धतीचं नियोजन होऊन तालुक्यातील गोरगरीब जनतेला रेशनिंगचं धान्य वेळेत व चांगल्या पद्धतीचे मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे
याबाबत गोदाम व्यवस्थापक सागर काटकर म्हणाले की पालखी सोहळा असल्याने गाड्या लवकर उपलब्ध झाल्या नव्हत्या उद्यापर्यंत सर्व दुकानादारांना धान्य पोहोचलेल असेल