सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील मंगळवार पेठेतील रावळ चौकात दोन दुकानदारांच्या वैयक्तिक भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवार दि.१९ सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.
या घटनेत वार झालेल्या तरुण गंभीर जखमी असून त्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार अनेक दिवसांपासून असलेल्या शेजारी शेजारी असणाऱ्या दोन दुकानदारांच्या दुकानातदारांच्या पूर्वीच्या वैयक्तिक भांडणांमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.भोर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.