Purandar Breaking l दुचाकी पेटवून देत नीरेत दहशत माजवण्याचा प्रयत्न : बापलेकाला मारहाण, युवक जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- -
निरा : प्रतिनिधी
नीरेच्या रहदारी असलेल्या पालखीतळा समोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुंडाकडून दहशत निर्माण करत दवाखान्यातून आलेल्या बापलेकांना जबर मारहाण करत त्यांची दुचाकी पेटवून देण्यात आली आहे. याबाबत नीरा पोलीसात जखमी सचिन कोरडे रा. खंडोबाचीवाडी (ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. 

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कोरडे यांचे वडिल संपत कोरडे एक गंभिर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर सातारा (शेंद्रे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना ट्रकमध्ये बसवून सचिन आपल्या अपाची दुचाकिवरुन नीरेत आले. पालखी तळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्रक आल्यावर वडिलांना खाली घेत असताना नीरेतील एक गाव गुंड आला व शिविगाळ करत दमबाजी करायला लागला. सचिनच्या डोळ्यात लाल तिखट चटणी टाकली, आधी सचिनला धक्काबुक्की केले व हातातील हत्याराने सचिन यांच्या डोक्यात जब्बार घाव घातल्याने रक्तस्राव झाल. ते जखमी झाल्याने दुचाकी तेथेच सोडून त्यांनी गावगुंडाच्या तावडीतून सुटका करण्या हेतू तेथून पळ काढला. तरीही त्या गावगुंडाने आजारी असलेल्या वडिलांवरही हल्ला केला. या नंतर अपाची दुचाकी घेऊन जेजुरीकडे पसार झाला. नंतर कळाले की ती दुचाकी त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळून टाकली. शिवाजी चौकात पेटती दुचाकी पाहून स्थिनक भयभीत झाले. नीरा पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जखमी सचिन कोरडे यांना उपचारासाठी नीरेच्या जिवनदिप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 
To Top