पुणे-आकुर्डी l पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
आकुर्डी : प्रतिनिधी 
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु. कॉलेज, आकुर्डी या विद्यालयामध्ये पारंपारिक पद्धतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. 
          आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल या विद्यालयामध्ये देखील त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. शिक्षकांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून शुभेच्छापत्र आणि पुष्प देऊन विद्यार्थ्यांकडून भक्ती-भावाने पूजन करण्यात आले. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या व्यक्तीला गुरुचा दर्जा दिला जातो व त्याला देवतुल्य समजले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनामधील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना नेहमीच ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी पथदर्शक म्हणून कार्यरत असतात आणि त्यासाठी ते सर्व समर्पण करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस. विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य, नाटुकले आणि कवितांमधून शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये अशी विविध जीवनमूल्ये रुजवण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या प्रिती दबडे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी तनिष्का पांढारकर आणि विलक्षा भिरूड यांनी केले.
To Top