पुरंदर l मोटारसायकल पेटवून मारहाण करणारा जेजुरी पोलिसांच्या ताब्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
निरा ता. पुरंदर येथे मोटारसायकल पेटवून मारहाण करणाऱ्या एकाला जेजुरी पोलिसांनी २४ तासात अटक केली. 
             अक्षय शेवाळे रा. निरा ता. पुरंदर याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी,
याबाबत नीरा पोलीसात जखमी सचिन कोरडे रा. खंडोबाचीवाडी (ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.  सचिन कोरडे यांचे वडिल संपत कोरडे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर सातारा (शेंद्रे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना ट्रकमध्ये बसवून सचिन आपल्या अपाची दुचाकिवरुन नीरेत आले. पालखी तळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्रक आल्यावर वडिलांना खाली घेत असताना अक्षय शेवाळे आला व शिविगाळ करत दमबाजी करायला लागला. सचिनच्या डोळ्यात लाल तिखट चटणी टाकली, आधी सचिनला धक्काबुक्की केले व हातातील हत्याराने सचिन यांच्या डोक्यात हातातल्या कड्याने जब्बार घाव घातल्याने रक्तस्राव झाल. ते जखमी झाल्याने दुचाकी तेथेच सोडून त्यांनी शेवाळेच्या तावडीतून सुटका करण्या हेतू तेथून पळ काढला. तरीही शेवाळेने आजारी असलेल्या वडिलांवरही हल्ला केला. या नंतर अपाची दुचाकी घेऊन जेजुरीकडे पसार झाला. ती दुचाकी त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळून टाकली. शिवाजी चौकात पेटती दुचाकी पाहून स्थिनक भयभीत झाले. नीरा पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. 
         पोलिसांनी अक्षय शेवाळे याला अवघ्या २४ तासात अटक केली आहे. 
 जेजुरी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी बी वाकचौरे, सर्जेराव पुजारी,पोलीस उपनिरीक्षक जेजुरी पोलीस स्टेशन अंकित नीरा पोलीस दूर क्षेत्र संतोष मदने, पोलीस हवालदार, पोना. हरिचंद्र करे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
To Top