सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील अंत्रोली ते घिसर रस्त्यावर मोठ भगदाड पडले असून निवी,घिसर,हिरवेवस्ती,अंत्रोली
गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे,
गेल्या चार पाच दिवसा पासून वेल्हे परिसरात पावसाची संततधार सुरु आहे , येथील शेतांना तळ्यांचे स्वरूप आले आहे,ओढे नदी,नाले यांना पुर आला आहे,कानंदी नदी दुथडी भरुन वाहत आहे,तर परिसरात जोराचा पाऊस सुरू आहे, अंत्रोली ते घिसर रस्त्यावर मोठ भगदाड पडले आहे,हे भगदाड पावसाने वाढते आहे, दुपार पासुन मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असुन पाऊसाचे प्रमाण वाढले तर रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस पाटील शिवाजी राऊत ,व गणेश राऊत यांनी दिली प्रशासनाने लवकर दुरुस्त करावा अन्यथा निवी,घिसर,हिरवेवस्ती,अंत्रोली चार गांवचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे