Baramati News l संत सोपानकाका पालखीतील लाखो वैष्णवांना रस्त्याचा अडसर : सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांची खंत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वरांचे आई-वडिलांनी ही वारी केली असल्याचा  इतिहास आहे.पूर्वीचे वांग्मय हे संतांचे प्रमाण असून विज्ञानाच्या कसोटीवर उतरण्याची ताकद वांग्मया मध्ये आहे असे मत संत सोपान काका पालखी सोहळा प्रमुख ऍड त्रिगुण महाराज गोसावी यांनी सोमेश्वर नगर येथे व्यक्त केले. 
     भारत ज्ञान विज्ञान समुदायांची संत सोपानकाका सोहळा ईतिहास व वारीची परंपरा याबाबत सखोल माहिती चा इतिहास सांगणारा ओढ आषाढी ची हा कार्यक्रम सोमेश्वर नगर येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
      संत सोपान काकांचा पालखी सोहळामधे एकूण 107 दिंडी असून सुमारे  लाखो वैष्णवांचा मेळा दरवर्षी सासवड वरून पंढरपूर कडे जात असतो. 
       प्रत्येकाने आयुष्यात येऊन एकदा तरी संतांची वांग्मय वाचले पाहिजे. सध्या तरुण पिढीचा वाढता ओघ पाहता पालखी सोहळा आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचे ते म्हनाले.
संतांनी वाङ्मयात लिहिलेला प्रत्येक  शब्द हा प्रमाण असून  या वाङ्मयातून सकारात्मक जीवन कसे जगता येते हे शिकायला मिळते असे ते म्हणाले.
    यावेळी ह भ प बाळासाहेब बारवकर महाराज, निखिल गाडगे महाराज यांनी पालखीची शिस्त कशी असते याबाबत माहिती दिली. सोपान काका सोहळ्याला तिचे पहिले पारितोषिक मिळते असे ते म्हणाले. भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे सदस्य नौशाद बागवान यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, राज्य समिती सदस्य संतोष शेंडकर तालुका अध्यक्ष शशिकांत जेधे, चैतन्य मोरे, महेश बैरागी, उप प्राचार्य शिवाजी शिंदे, सरपंच हेमंत गायकवाड ,युवराज खोमने इत्यादी मान्यवर हजर होते. 
आभार संभाजी खोमणे यांनी मानले.
--------------------
पालखी मार्गाची दुरुस्ती व रुंदीकरण होणे गरजेचे 
सुमारे एक लाख समुदाय असलेला वैष्णवांचा मेळा दरवर्षी सासवड वरून पंढरपूरकडे जात असतो . सासवड वरून निघाल्यानंतर वीर फाटा ते मांडकी रस्ता खूप अरुंद आहे. पुढे आल्यानंतर निरा बारामती रस्ता देखील अद्याप रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्याही पुढे लासूर्णे,निरवांगी, सराटी, लाखेवाडी इत्यादी ठिकाणचे रस्ते खूप अरुंद असल्याने पालखी सोहळ्याला बरेच वेळा अडचण निर्माण होते. कीर्ती शौचालय सोपान काका चे सोहळ्याला देखील वाढवण्याची गरज असल्याचे ही मत सोहळा प्रमुख यांची सह अनेक वारकरी व दिंडीला शिस्त लावणारे चोपदार यांनी व्यक्त केली.
To Top