Baramati News l बारामतीच्या कृषिकन्यांनी घेतले कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती चे विद्यार्थी रावे उपक्रमा अंतर्गत विविध गोष्टी करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून लाटे गावात ब्रह्मास्त्रचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते . 
        ब्रह्मास्त्र हे एक रसायन विरहित कीटकनाशक आहे. तसेच पर्यावरणाला याचे काहीच दुष्परिणाम होणार नाहीत. आपण हे कीटकनाशक घरी व कोणताही खर्च न करता हे बनवू शकतो. याचा उपयोग आपण हरभऱ्या वरची अळी, भेंडी वरची अळी, सोयाबीन वरची उंट अळी, इ.साठी करू शकतो. ह्या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रगतशिल शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन कृषिकन्या नेत्रा देसले , वसुंधरा नलावडे , अनुजा देशपांडे, श्रावणी चव्हाण, ज्ञानेश्वरी शेजवळ , सृष्टी डाळिंबे यांनी उत्कृष्ट रित्या केले . त्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा . एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले आणि प्रा.करपे मॅडम (अग्रोनोमी विभाग ) यांचे मार्गदर्शन कृषिकन्यांनी मिळाले. 
----------------------
ब्रह्मास्त्र कसे बनवावे
३ कि.कडुलिंबाचा पाला,१० लि. गोमूत्र,२ कि. पपई, सीताफळ, डाळिंब,पेरू च्या पानांचा चुरा करून पाण्यामध्ये मिक्स करावे...वरील सर्व मिश्रण अर्धे होईपर्यंत आटवावे. २४ तासानंतर हे मिश्रण सुती कापडाने गळून घ्यावे. प्रमाण-२-२.५ ली.१०० ली. पाण्यामध्ये मिसळून एका एकर साठी वापरावे...
हे ब्रह्मास्त्र ६ महिने टिकते.
To Top