सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील २००५ साली बांधलेले भैरवनाथ मंदिराचे शिखर रात्रीच्या मुसळधार पावसाने कोसळले.
गावातील लोकांनी एकत्र येत २००१ साली सुरू केलेल्या व २००५ साली का पूर्ण झालेल्या भैरवनाथ मंदिराचे शिखर काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कोसळले. ११० फूट उंच शिखर असलेल्या भैरवनाथ मंदिराचे शिखर कोसळल्याने गावातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. तीन वर्ष या मंदिराच्या बांधकामाला पूर्ण होण्यास लागले होते. गावाच्या मध्यभागी उभे असलेले भैरवनाथाचे मंदिर येथील लोकांचे श्रद्धास्थान आहे पहाटे तीन वाजता दुर्घटना घडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंदिराच्या जिर्णोदरासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
COMMENTS