Rajgad l तालुक्यात ड्रीमलँडचाच डंका : १४ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिनही क्रमांक मिळवुन बाजी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे ; मिनल कांबळे
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ड्रीमलँड इंग्लिश स्कुल विद्यालयाने १४ वर्षा खालील गटात सलग तिनही क्रमांक मिळवुन बाजी मारली आहे, याबाबत पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष दसवडकर व प्राचार्या तृप्ती शिळीमकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले,
जिल्हा परिषद पुणे क्रीडा विभाग व  राजगड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मालवली येथील ड्रीमलँड इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आली होते, या स्पर्धेचे उद्घाटन विश्व फाउंडेशनच्या सच्चालिका सुप्रिया दसवडकर व प्राचार्या तृप्ती शिळीमकर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुरेश खाटपे यांच्या हस्ते करण्यात आले,
या बुद्धिबळ स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे
१४ वर्ष वयोगट मुली - 
१) श्रेया कानिफनाथ वाघमोडे - प्रथम
२) अनुष्का आशिष लिम्हण - द्वितीय
३) रिद्धी श्रीराम भोसले - तृतीय
( सर्व ड्रीमलँड इंग्लिश स्कूल मालवली) 
१४ वर्ष वयोगट मुले - 
१) प्रताप वैभव आल्हाट - प्रथम ( दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी) 
२) कार्तिक मारूती शेजवळ - द्वितीय (मातोश्री  सौनाबाई देडगे विद्यालय रूळे ) 
३) श्रीनाथ नाना सरपाले  - तृतीय ( राजे शिवछत्रपती विद्यालय सोंडे माथना ) 

१७ वर्ष वयोगट मुली - 
१) प्रमिला राहुल बि-हामणे - प्रथम ( दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी) 
२) अन्विता संजय बढे  - द्वितीय ( सरस्वती विद्यालय अंबवणे) 
३) जान्हवी विलास ननावरे  - तृतीय ( सरस्वती विद्यालय अंबवणे)
१७ वर्ष वयोगट मुले - 
१) आदित्य सुर्यकांत रेणुसे  - प्रथम ( तोरणा  विद्यालय वेल्हे ) 
२) दिपक अशोक मोहिते  - द्वितीय (मातोश्री सौनाबाई  देडगे विद्यालय रूळे ) 
३) सोहम रामचंद्र मोरे  - तृतीय ( न्यु इंग्लिश स्कूल पासली ) 

१९ वर्ष वयोगट मुली -
१) सृष्टी काशिनाथ दारवटकर प्रथम ( तोरणा  विद्यालय वेल्हे ) 

१९ वर्ष वयोगट मुले -
१) सुनिल जानु कचरे-  प्रथम ( तोरणा  विद्यालय वेल्हे )
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन मनोज पंडीत,नंदु पगार,भाग्यश्री वाघमोडे,फडतरे,सोंडकर यांनी काम पाहिले,

To Top