जावली l रक्षाबंधनासाठी बहिणीकडे निघालेल्या सातारच्या भावाचा मेढ्यातील दुचाकी अपघातात मृत्यु

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे 
मेढा एसटी डेपो समोर झालेल्या अपघातात खेड येथे बीडीएस चे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदित्य संजय साळुंखे याचा दोन चाकीवरून पडून अपघात झाला. या अपघातात त्याला जबर मार लागल्याने त्याचा सातारा येथे उपचार्थ दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे रक्षा बंधनाला साळुंखे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर उभा राहिलास आहे. 
           घटणा स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार सातारा येथे राहणारा आदित्य संजय साळुंखे ( वय २२ ) हा खेड येथे बीडीएस च्या चौथ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत होता. रविवार व सोमवारी रक्षा बंधन जोडून सुट्टी आल्याने तो खेड येथुन सायंकाळी बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी पलसर गाडी नं. एम एच ०२ डीई ९३६५ वरून सातारकडे निघाला असता मेढा येथिल एस टी डेपोच्या समोर ( शनिवारी ) रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान त्याचा अपघात झाला.
             दरम्यान अपघात कसा झाला याबाबत कोणालाही काही समजले नसले तरी अपघात स्थळा जवळ राहत असलेल्या लोकांनी मोठ्याने कोणी तरी ओरडल्याचा आवाज ऐकला असल्याचे सांगितले. त्याचवेळी दहीहंडीचा सराव करून घरी परतणाऱ्या मुलांनी झालेला अपघात पाहुन जखमीस ग्रामीण रुग्नालयात नेले. त्यानंतर पुढील उपचारार्थ आदित्य यास सातारा येथे नेले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. 
              या घटणेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घेण्याचे काम सुरु  होते. अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता घटणेची नोंद घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे अधिक माहिती मिळु शकली नाही.

To Top