Bhor News l संतोष म्हस्के l भोर तालुक्यात बहिणींच्या खात्यात रक्कम जमा : ११ बँकांमधून ३ हजार ४१४ बहिणींच्या खात्यात १ कोटी २ लाख ४२ हजार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
राज्य सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत भोर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११ शाखेंमध्ये ३ हजार ४१४ बहिणींच्या खात्यात एकूण १ कोटी २ लाख ४२ हजार रक्कम जमा झाली असल्याची माहिती विभागीय अधिकारी विनोद काकडे यांनी दिली.
     राज्य शासनाने महिलांसाठी राबवलेली योजना सुरू केली असून या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १ हजार ५०० रुपये जमा होणार असून रक्षाबंधनापूर्वी या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.दोन महिन्यांची रक्कम शासनाने महिलांच्या खात्यांवर जमा केली असल्याने पैसे काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये लाभार्थी बहिणी गर्दी असल्याचे चित्र आहे.दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने खातेदारांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बँका चालू ठेवण्यात आलेल्या आहेत.
--------------
मुलांच्या शिक्षणासाठी पैशांचा वापर करणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यातून मिळणारे दरमहा १ हजार ५०० रुपये पुढील काळात मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणणार असल्याचे लाडकी बहीण लाभार्थी महिला यांच्याकडून सांगण्यात आले.
                                   
To Top