सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
दुर्गम डोंगरी वीसगाव खोऱ्यातील पळसोशी ता. भोर येथील तंटामुक्त अध्यक्षपदी प्रकाश रघुनाथ म्हस्के यांची बिनविरोध मंगळवार दि.१४ निवड करण्यात आली.
प्रकाश म्हस्के कायमच गाव पातळीवरील सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असतात. त्यांच्या समाज हिताच्या कार्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळत असते.माजी तंटामुक्त अध्यक्ष तानाजी म्हस्के यांचा कार्यकाल संपल्याने नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून ग्रामसभेत प्रकाश म्हस्के यांची निवड केली गेली.यावेळी सरपंच सुनीता म्हस्के,उपसरपंच सारिका म्हस्के ,ग्रामसेवक जालिंदर तळेकर,अरुण म्हस्के, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोपान म्हस्के,ज्ञानेश्वर म्हस्के,आनंदा म्हस्के,आनंदा बा. म्हस्के माजी सैनिक बंडू म्हस्के,शंकर म्हस्के, लक्ष्मण म्हस्के आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.