Baramati News l मुरूमचे अवधूत कोरडे महाराष्ट्र कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी : हरियाणा येथे राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) येथील अवधूत कोरडे यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या वतीने जाणाऱ्या कुस्ती संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. 
           हरियाणा राज्यातील रोहतक येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने तेविस वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून मुलांचे आणि मुलींचे संघ पाठविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने मुलांच्या ग्रीक रोमन संघाचे प्रशिक्षक म्हणून कोरडे यांना पाठविले आहे. कोरडे यांनी बुडापोस्ट, नेपाळ या देशात आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच कुस्तीमधील प्रशिक्षकपदासाठीच्या 'एनआयएस'च्या अभ्यासक्रमात अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. क्रीडा प्रबोधनीचे माजी खेळाडू आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडा उपसंचालक जगन्नाथ लकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  
To Top