Baramati News l महाराष्ट्र शासनाच्या वॉटर कप स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातून निंबुतच्या भैरवनाथ पाणी वापर संस्थेची निवड

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्हयातुन ३ संस्था पात्र झाल्या आहेत त्यामध्ये निंबुत येथील श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत ता. बारामती या संस्थेची निवड झाली असुन प्राथमिक फेरी अंतर्गत संस्था पात्र झाली आहे. 
          महाराष्ट्र शासनाकडुन समन्वयक म्हणुन 
विष्णु खेडेकर व अरुण भगत साो यांची व्दिसदसीय कमेटी भेटीसाठी आली होती. त्यावेळी पिंपरा शाखाधिकारी रूपाली मुळे , दत्तात्रय शिंदे गोपीचंद धुमाळ  संस्थेचे उपाध्यक्ष प्रदिपकुमार काकडे संचालक  कुमार काकडे,  सतिश लकडे विलासराव काकडे, संपत लकडे, हनुमंत काकडे जुम्मन सय्यद, भरत काकडे, संचालीका भारती काकडे, ज्योती काकडे, तोफीक सय्यद, शंकरराव निकाळजे तसेच सभासद उपस्थित होते संस्थेचे सचिव  मदन काकडे यांनी प्रास्तविक केले. 
To Top