Baramati News l वनविभागाच्या हिरवाईसाठी आरंभ सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार : १२५ विदेशी झाडांचे वृक्षारोपण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान सोमेश्वरनगर पंचक्रोशी या प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या श्रमदानातून सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण पूरक उपक्रम वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे राबविण्यात आला. 
          यामध्ये वड, कडुलिंब, चिंच, पिंपळ अशा देशी झाडांचे वृक्षारोपण आज दि. ४ रोजी करण्यात आले व त्याचे संगोपन करण्याचा संकल्प सर्व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केला. उपक्रमामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतनकुमार सकुंडे , संभाजी भुजबळ, कृष्णा कोळेकर ,सुजित सावंत ,स्वप्निल जगताप, प्रमोद फरांदे, किरण गायकवाड, केतन कुलकर्णी, लोकेश सत्यागिरी, बाळकृष्ण भोसले ,प्रदीप मांगडे विराज जगताप, पुष्कराज जगताप आणि सर्व युवक उपस्थित होते या या उपक्रमाला वनविभागाच्या चौधरी साहेब, काळे मॅडम ,नंदकुमार गायकवाड, नवनाथ रासकर यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top