सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
वीर धरणाची पाणी पातळी ५७९.६५ मीटर झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता वीर धरणाच्या वरील भागातील निरा देवघर धरण(९५.४९%),भाटघर धरण १००% तर गुंजवणी धरण(९०.००%)भरलेली असल्याने व या सर्व धरणांतून विसर्ग पुन्हा वाढल्याने तसेच वीर धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक जास्त असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ०४/०८/२०२४ रोजी दुपारी १४.०० वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ५३८४७ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता ६१९२३ क्युसेक्स करण्यात आला होता. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. तर ४ वाजता वीर धरणातून निरा नदीपात्रात ६३ हजार १७३ क्युसेस पाण्याचा प्रवाह करण्यात आला आहे.
-------------------
नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग
दिनांक-4-8-24(4:00 pm)
भाटघर. = 26131 Cusecs
नीरा देवघर=8702 Cusecs
गुंजवणी =4282 Cusecs
--------------------------------
एकुण = 39115 Cusecs
-----------------------------------
वीर- = 63173 Cusecs