सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील एका गावामध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळींबा फासणारी घटना घडली असून आनंदा मारुती सणस या व्यसनी मुलाने आपल्या पंचावन्न वर्षाच्या आईवरच बलात्कार केला आहे. पोटच्या पोरानेच बलात्कार केल्याची तक्रार करण्याची वेळ या मातेवर आली असून पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जावली तालुक्यातील पुर्नवसित गावातील आनंदा मारुती सणस याने आपली आई किचन मध्ये काम करत असताना मागून येऊन मिठी मारली व आईला तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आणि कोणाला काही सांगू नको नाहीतर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. परंतु आईने मेढा पोलीस ठाण्यात या मुला विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेने तालुक्यात खळबळ निर्माण झाली असून आई व मुलाच्या नात्याला काळींबा फासणाऱ्या मुलाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटणेचा अधिक तपास सपोनि अश्विनी पाटील करत आहेत.