सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भोर तालुक्यात शनिवार दि .३ ऑगस्ट रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठराविक ठिकाणच्या फुलांवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे भोर प्रशासन सज्ज असून तालुक्यात सर्व दूर मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पश्चिमेकडील भागात पावसाने थैमान घातले असल्याने पुढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. दरम्यान अनेक ठिकाणच्या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणारे पूल बंद करण्यात आले आहेत.सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कडधान्य पिकांची नासाडी होत असल्याने पाऊस थांबण्याची शेतकरी वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे.
COMMENTS