सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय गडदरवाडी-खंडोबाचीवाडी या विद्यालयातील श्रेया बापू शिंदेने ३८ ते ४२ किलो वजन गटात तायक्वांदो या क्रिडा प्रकारामध्ये बारामती तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून तिची पुणे येथे जिल्हा पातळीवर होणार्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच वैभवी आबासो मदने या विद्यार्थिनीने १४ वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
सदर विद्यार्थिनींना शिक्षक खताळ यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थिनींचे संस्थाचालक हनुमंतराव कोकरे तसेच खंडोबाचीवाडी व गडदरवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.