Dam update l दिवसभर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम : नीरा नदीपात्रात आज पुन्हा ६३ हजार २७३ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
 वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
        नीरा देवघर धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे .तसेच भाटघर धरण ,निरा देवघर व  गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ झाली आहे तसेच  वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊसाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज दि. २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या  कालव्याच्या अतीवाहका द्वारे ३५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेऊन निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ५३ हजार ८४७ क्यसेक्स  विसर्गामध्ये वाढ करून ६१ हजार ९२३  क्यसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ६३ हजार २७३ क्युसेक्स आहे. 
To Top