पुरंदर तालुका जुनी पेन्शन संघटना अध्यक्षपदी कुंडलिक कुंभार : तर महिला अध्यक्षपदी निलिमा फडतरे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
नुकतेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा पुरंदर तालुक्याचे पुनर्गठन करण्यात आले.
      पुरंदर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटना अध्यक्षपदी कुंडलिक पंढरीनाथ कुंभार तर महिला अध्यक्षपदी निलिमा सुभाष फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
         कार्याध्यक्ष संतोष ज्ञानदेव इनामके , तसेच नेतेपदी शरद गोपीचंद पवार  यांची  निवड करण्यात आली.
तसेच महिला आघाडी
सरचिटणीस शितल अविनाश जाधव
कार्याध्यक्ष  सरिता हेमंत टिळेकर
उपाधयक्ष मिरा अतुल मोरे,
मिडिया प्रमुख शुभांगी दिपक गिरी व पुणे जिल्हा महिला सरचिटणीसपदी स्वाती दादासाहेब कटके यांची एकमताने निवड करण्यात आली.
       जिल्हा कार्यकारणीच्या वतीने निरीक्षक म्हणून जिल्हाध्यक्ष  बबनराव म्हाळसकर ,सोशल मीडिया प्रमुख सोमनाथ कुदळे यांनी अध्यक्ष व कार्यकारणीस निवडीचे पत्र  देऊन जुनी पेन्शन पुरंदर तालुका कार्यकारणी व महिला कार्यकारणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
        या बैठकीसाठी  पुरंदर तालुक्यातील जुन्या पेन्शन संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश बनकर यांनी केले. तर आभार माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मानले.
       यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष  कुंडलिक कुंभार व निलिमा फडतरे यांनी निवडीनंतर सांगितले की,जुनी पेन्शन हा आपला अस्तित्वाचा प्रश्न असल्याने सर्व मिळून आपण ताकतीने लढा उभा करू.  तसेच शासन दरबारी आपली मागणी ताकतीने मांडून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्षशील भूमिका घेतली जाईल.


To Top