सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गाळप हंगाम २०-२१ मधे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ११ लाख ३९ हजार ३१० में. टनाचे गाळप केले होते. गळीत हंगामात सभासदांना प्रति टन ३१०० रुपये एवढा दर देण्यात आला होता. शरयू कारखान्याने सभासदांच्या हक्काचे २ कोटी ९० लाख रुपये २०/२१ या आर्थिक वर्षात दिले असते तर सभासदांना टनाला अधिकचे २५ रुपये मिळाले असते असा आरोप सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी केला आहे.
शरयू कारखाने वेळेवर पैसे न दिल्याने सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचा आर्थिक तोटा झाला असल्याचे देखील ते म्हणाले, सोमेश्वर आणि शरयू कारखान्याचा सन २०२०-२१ साली उसासह ऊसतोडणी वाहतुकी बाबत करार करण्यात आला होता. यामध्ये तोडणी वाहतुकीची बिले कमिशनसह सोमेश्वर कारखान्याप्रमाने देण्याचे ठरलेले असताना शरयू कारखान्याने मात्र ते वेळेत अदा न केल्याने सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता शरयू कारखान्याने सोमेश्वर कारखान्याची असलेली रक्कम रुपये ७२ लाख १ हजार ६८४ ही रक्कम सोमेश्वरला अदा केली आहे. यामध्ये शरयू कारखान्याने सोमेश्वरकडे बगॅसपोटी भरलेली ६ लाख ७७ हजार ४७२ व सोमेश्वर कारखान्यासाठी पुरवण्यात आलेल्या चुन्यासाठीची रक्कम ५९ हजार ५१३ रुपये वजा करून ६४ लाख ७५ हजार २६६ ही रक्कम शरयू कारखान्याने सोमेश्वर कारखान्याला दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी अदा केली. येथून पुढील काळात जर शरयू कारखान्याने जर कधी सोमेश्वर शी आर्थिक व्यवहार केला तर तो त्यांनी वेळेत पूर्ण करावा जेणे करून सोमेश्वरच्या सभासदांचे आर्थिक नुकसान होणार नाही ही माफक अपेक्षा.
--------------------------------
एफआरपी ची रक्कम १५ दिवसांमध्ये देणे बंधनकारक असते साखर कारखाना देऊ शकला नाही तर सभासदांना, शेतकऱ्यांना त्यावरील व्याजाची रक्कम ही साखर कारखान्यांना द्यावी लागते याचा विचार करत शरयू कारखाना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची व्याजासहित रक्कम परत करेल अशी अपेक्षा संचालक मंडळाची होती. व्याजाची ही रक्कम सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला सूपूर्त करावी अशी माझी मागणी आहे.
ऋषी गायकवाड
(संचालक,सोमेश्वर कारखाना)