सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
नीरा : प्रतिनिधी
वीर धरणा मधून मोठ्या प्रमाणात सोडलेले विसर्गामुळे सध्या नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. आज दि. २६ रोजी सायंकाळी ५ वाजता निरा येथील सचिन बापूराव गोरे वय ३० रा. नीरा वर्ल्ड नंबर ३ येथील युवकाने दुतडी भरून वाहत असलेल्या नीरा नदीमध्ये ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली.
हा तरुण नशेमध्ये असल्याचे प्रथमदर्शी पाहणाऱ्यांनी सांगितले. निरा नदीवरील जुन्या ब्रिटीश कालीन पुलावर
आल्यानंतर कपडे काढून तो उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना अनेक तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्याने ब्रिटिश कालीन पुलावरून उडी मारली. नशेमध्ये असल्याकारणाने त्यांनी कोणाचेही ऐकले नाही ब्रिटिशकालीन पुलावरती पाण्याचा प्रवाहाचा वेग जोरात असल्याकारणाने तो तरुण वाहत खाली गेला. नीरा येथील युवकांनी बरीच शोधाशोध केल्यानंतरही तो अद्याप सापडला नाही.