पुरंदर l 'शिक्षणमैत्रेय' परिवार पुरंदर-हवेली यांच्यातर्फे पिंपरे येथील विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी 
पुरंदर तालुक्यातील गोरगरिबांची मुले शिकावीत व तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडावी, गरीब घरचा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये शिक्षण मैत्रेय परिवार पुरंदर हवेली या संघातर्फे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. 
          याच अनुषंगाने बा.सा.काकडे महाविद्यालय पिंपरे येथे पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य दत्ता झुरंगे यांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील 289 विद्यार्थी बा. सा. काकडे विद्यालयातील 165 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले 
यावेळी सोमेश्वर चे माजी संचालक दिलीप थोपटे, विजय थोपटे, यांच्यासह रोहिदास थोपटे, बाळासाहेब थोपटे, सचिन मोरे , प्राथमिक शाळा मुख्याध्यापक महादेव माळवदकर, बा. सा. काकडे विद्यालय मुख्याध्यापक कैलास नेवसे, यांच्याबरोबर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-भाऊसो बरकडे, प्रास्तविक-महादेव माळवदकर , आभार मधुकर झगडे  यांनी मानले.
To Top