सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील रणजित नारायण सावंत यांची धाराशिव जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. रणजित सावंत हे १९९५ साली पोलीस दलात पीएसआय या पदावर रुजू झाले. गेली ३० वर्ष त्यांनी मुंबई, सातारा, ठाणे, धाराशिव, सोलापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर याठिकाणी आपली सेवा बजावली आहे. तसेच राज्य गुप्तचर विभागात तीन वर्षे सेवा बजावली आहे. त्यांची सद्या धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. बारामती तालुक्यातून कौतुक होत आहे.