Baramati News l बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जागतिक पातळीवर जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
बारामती मध्ये रविवार दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रयत भवन मंगल कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जागतिक पातळीवर जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
              कार्यक्रमाला स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर,योगेश राजे होळकर, अहिल्यादेवी चे वंशज अक्षय शिंदे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे , माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , नेते युगेंद्र पवार,    दशरथ राऊत राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय प्रजा जन समाज पार्टी ,बाळासाहेब  गावडे, विश्वासराव देवकाते पाटील, सतीश खोमणे, Dr. शशिकांत तरंगे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी  कांबळे, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सरचिटणीस काळुराम चौधरी, सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष Ad. शिवाजी डमाळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य समन्वयक प्रकाशजी घोळवे , राज्याध्यक्ष अरुण जाधव व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
          या महोत्सवाला वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समिती एकता सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
           या जयंती महोत्सवात मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिवादन करण्यात येणार आहे.मान्यवरांचे सत्कार, मान्यवरांचे मार्गदर्शन, विशेष सत्कार, समाजातील समाज बांधवांनी व भगिनी यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरुषांना समाज भूषण पुरस्कार व महिलांना अहिल्या रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
             बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती महोत्सवा साठी समिती चे अध्यक्ष बबनराव आटोळे, उपाध्यक्ष अँड.गुलाबराव गावडे, कार्याध्यक्ष गोविंदराव देवकाते, सरचिटणीस महेंद्र खटके, समन्वय अनिल आटोळे, संपर्क प्रमुख गजानन भगत,संघटक वीरधवल गाडे,व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.
         ११ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता रयत भवन मंगल कार्यालय बारामती येथे देशभरातील धनगर समाज बांधव एकत्र येत आहेत.   सर्वसमाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जागतिक जयंती महोत्सव साठी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.
To Top