सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील तनुष्का शिवाजी भुजबळ इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांनीने बारामती येथील कुस्तीगीर संघ यांच्या वतीने घेतलेल्या पुणे जिल्हा शालेय क्रीडा कुस्ती स्पर्धेत तालुकास्तरावरील १७ वर्षे वयोगटातील ४६ किलो वजनाखालील ६ मुलींना लढत देऊन चीतपट करत प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या वजन गटात निर्विवाद वर्चस्व मिळवल्याबद्दल तिला सन्मानचिन्ह देण्यात आले. तनुष्काने जिल्हास्तरापर्यंत मजल मारली आहे.
मागील वर्षी देखील तनुष्काने शालेय, तालुका, पुणे जिल्हा व राज्यस्तरापर्यंत कुस्तीमध्ये भरीव कामगिरी करत आपला ठसा उमटवला. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले व तिचे पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
शाळेतील क्रीडाशिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे तनुष्काला अनमोल मार्गदर्शन लाभले.