भोर : पत्रकारांना अर्वाच्च भाषा वापरणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी : भोर तहसीलदारांना पत्रकार संघाचे निवेदन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-- --
भोर : प्रतिनिधी
मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर
झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते.यावेळी पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या.आपले कर्तव्य बजावत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच भाषा वापरली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकाराचा निषेध अनेक घटकांकडून नोंदविण्यात येत असतानाच या प्रकरणी पत्रकार संघ भोरच्या वतीने तहसिलदार भोर येथे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
     नवीन पत्रकार संरक्षण कायदा व भारतीय संविधान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून म्हात्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघ भोर यांच्या वतीने तहसिदार यांना देण्यात आले आहे.यावेळी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सचिव संतोष म्हस्के, सहसचिव कुंदन झांजले व खजिनदार विक्रम शिंदे, सहखजिनदार दत्तात्रय बांदल, रुपेश जाधव ,दीपक पारठे उपस्थित होते.

To Top