Bhor Breaking l २० गुंठ्याची नोंद लावायला २० हजार मागितले : रांझे गावातील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जमिनीची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्याकडे २० हजाराची मागणी करणारा भोर तालुक्यातील रांझे गावाच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करत २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 
      पुणे सातारा महामार्ग नजीकच्या रांझे ता.भोर येथे तलाठी सुधीर दत्तात्रय तेलंग वय-५६ याला बुधवार दि. २१ रोजी लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
               याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या काही दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती.तक्रारदार यांनी रांझे गावात काही २० गुंठे जागा खरेदी केली होती. तक्रारदार यांच्या जागेची नोंद ग्राह्य धरण्यासाठी व सातबारा उता-यावर नोंद घालण्यासाठी तलाठी तेलंग यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक गुंठ्यात एक हजार अशी २० हजार रुपयांची मागणी केली होती.
           सदर  तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता लोकसेवक सुधीर तेलंग यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन सदर रक्कम तेलंग यांनी पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करीत आहेत.
To Top