कधी मिळेल न्याय...l कवयीत्री : दीपाली गायकवाड lहल्ली तर माझी कविता ही, नाकारू लागलीय लेखन, हाल सोसवेनात आता तिला, या अन्यायाला कधी लागणार वेसन ?

Admin


दिपाली गायकवाड : वाघळवाडी (बारामती)
मो. 91 75172 79915
हल्ली तर माझी कविता ही 
नाकारू लागलीय लेखन ,
हाल सोसवेनात आता तिला
या अन्यायाला कधी लागणार वेसन ?
अरे, जिच्या उदरी जन्मलास
 त्या नारीशक्तीचीच होतेय  शिकार
माणुसकीच्या माणूसपणाचा ,
हितचं वाटतोय धिक्कार.
अजून कित्येक वर्ष तिने सहन
 करायचा हा क्रूर पणाचा अन्याय ,
 बीभत्सेच्या या नजरेतून तिला 
कधी मिळणार न्याय ?
हिंसक श्‍वापदापेक्षाही दरिद्री तुझं वागणं ,
का ऐकू येत नाही तुला तिचं आर्त सांगणं ?
स्त्रीशक्ती चा अर्थ अजूनही कळला नाही या जगाला, 
म्हणूनच स्त्रीवर अत्याचार करण्याचे धाडस होते या नराधमांना .
प्रत्येक स्त्रीचा प्रश्न आहे या जगाला ,
 कधी मिळेल न्याय या प्रत्येक पिडितेला ?
कधी मिळेल न्याय या प्रत्येक पिडितेला? 
To Top