Baramati Breaking l बारामती येथे एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून : शहरात जळोची काळा ओढा येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
गणेश वाघमोडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.
गणेश वाघमोडे या आरोपीने अल्पवयीन वयात असताना शाळेच्या समोरच शशिकांत कारंडे यांचा धारदार शस्त्राने खून केलेल्या गणेश वाघमोडे या युवकाचा अज्ञात हल्ल्यखोरांनी धारदार शस्त्राने घाव घालून खून केल्याची घटना काल रात्री बारामती शहरात जळोची काळा ओढा येथे रात्री आठ वाजता उघडकीस आली आहे.
            गणेश वाघमोडे अल्पवयीन वयात असताना त्याने बारामती शहरातील श्रीराम नगर मध्ये शशिकांत बाबासो कारंडे यांची दोन वर्षांपूर्वी १७ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले होते, या तिघांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली होती.
पॅरोल वर सुटून आलेल्या गणेश वाघमोडे याने एक वर्षांपूर्वी देखील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाबाहेर धारदार शस्त्राने वार करून एकाला गंभीरित्या जखमी केले होते या संदर्भात देखील बारामती शहर पोलीस स्टेशनला गणेश वाघमोडे विरुद्ध 307 कलमा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
To Top