सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
पोलीस खात्यात कार्यरत असताना विनोद नामदास हा पुरंदर तालुक्यातील निरा येथील दुचाकी चोरीच्या प्रकरणात सापडला. या प्रकरणानंतर पोलीस खात्याने नामदास याला निलंबित केला होता. मात्र चोरीचे त्याचे व्यसन काही थांबले नाही. मुरूम येथील रोहित जाधव याच्या साथीने चोरीचा उद्योग त्याने चालूच ठेवला होता.
या दोघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार मोढवे ता. बारामती जि.पुणे गावचे हद्दीतून उंबरवाडा बालगुडेवस्ती येथुन दि.११ जुलै रोजी दुपारीच्या सुमारास संजना कांतीलाल शिंदे रा उंबरवाडा बालगुडेवस्ती मोढवे ता बारामती यांना भोसले वस्ती कोठे आहे, असे विचारून त्यांचे जवळ जावुन साक्षीदार कुसुम बालगुडे यांचे डोक्यात चाकुने वार करून त्यांचे गळयातील मनी मंगळसुत्र हिसकावुन घेत असताना त्यांनी प्रतीकार केला असता, त्यांचे उजवे व डावे हातावर परत चाकुने वार केला तेव्हा फिर्यादी या साक्षीदार यांचे मदतीला गेल्या असता आरोपीनी फिर्यादीस देखील चाकुने मारहाण करून तेथुन निघुन गेले बाबत त्यांचेवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. सदर गुनहयाचे तपासात गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे संशईत विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी (विकासनगर) ता. बारामती जि. पुणे, व रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्यातील रोहीत विनायक जाधव याने मोढवे गावचे हद्दीत सन २०२२ साली जबरी चोरी तसेच वडगाव निंबाळकर गावचे हद्दीत सन २०२४ साली निरा डावा कॅनॉलवर इलेक्ट्रीक मोटारची चोरी केलेचे कबुल केले आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी विनोद मारूती नामदास रा. वाणेवाडी ता. बारामती जि. पुणे, व रोहीत विनायक जाधव रा. मुरूम ता. बारामती जि. पुणे यांना अटक केली आहे. तरी वरीलआरोपी याचेकडुन खालील जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेले खालील ३ गुन्हे उघड झाले आहेत.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सपोनि संकपाळ स्था. गु.शा., वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई पांडुरंग कन्हेरे, पो हवा रमेश नागटीळक, महेश पन्हाळे, सागर देशमाने, अमोल भोसले, अनिल खेडकर, पो. ना भाउसो मारकड, हृदयनाथ देवकर, पोशि पोपट नाळे, तसेच सहाफौज बाळासाहेब कारंडे, पोहवा स्वप्नील अहिवळे, पवार, अभिजीत एकशिंगे स्था.गु.शा.पुणे ग्रा. यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.