Dam update l सावधान....! वीर धरणातून निरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला : निरा नदी @६३२७३ क्युसेक्स

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
वीर धरण १००% भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच भाटघर व निरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडत आहे. 
           वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने आज दि. २४ रोजी सायंकाळी ५ वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे ३५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेऊन निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ५३ हजार ८४७ क्यसेक्स  विसर्गामध्ये वाढ करून  ६१ हजार ९२३क्यसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे.आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग ६३ हजार २७३क्युसेक्स असणार आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. 
To Top