सुपे परगणा l सुपे येथे 'नाट्यरंग'-'आविष्कार कलांचा' अभिनय कार्यशाळा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : वार्ताहर
सुपे ( ता. बारामती ) येथील विद्या प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 'नाट्यरंग' (अविष्कार कलांचा) ही एक दिवसीय अभिनय कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
           येथील इयत्ता १ ली ते ११ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या अभिनय कार्यशाळेस ललित कला केंद्राचे कलाकार ऋषी दळवी व बारामती येथील एकांकिका व नाटकातील कलाकार स्वप्नील कुचेकर या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कला अविष्कारांविषयी मार्गदर्शन केले. 
            या एक दिवसीय अभिनय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक छोट्या छोट्या गोष्टींची विस्तृत माहिती दिली. तसेच नाटक सादरीकरण करताना विंगच्या पाठीमागे उभे रहावे, आवाजामध्ये चढउतार असावा. तर ब्लॅक आउट मध्ये पंजावर पळावे, ब्लॅक आउट हा आठ सेकंदाचा असतो.
    तर अभिनयाच्या वेळी प्रेक्षकांना पाठ दाखवू नये, आवश्यक त्या ठिकाणी पाठ दाखवली तरी ते योग्य असते. अभिनयामध्ये नऊ रसांचा समावेश होतो या सर्व गोष्टींचे ज्ञान देत दळवी यांनी रंगमंच विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती हा कलाकार असतो असे सांगत विद्यार्थ्यांनाही रंगमंचावर येऊन भूमिका करण्याची संधी त्यांनी दिली.
       तसेच कलाकार स्वप्निल कुचेकर यांनी एकपात्री नाटक काय असते, त्याचे सादरीकरण कसे करावे हे प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना दाखवून दिले. त्याचबरोबर एकाग्रता वाढविण्यासाठी मेडिटेशनचे महत्व देखील त्यांनी मुलांना समजावून सांगितले.
        यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडत असताना या कार्यशाळेतील अभिनयाचे धडे भविष्यात उपयोगी ठरतील. तसेच या कार्यशाळेच्या माध्यमातून कलेच्या जोरावर ही आम्ही करिअर घडवू शकतो ही जाणीव झाली, असे मत व्यक्त केले.
       यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, शिक्षक व इयत्ता १ ली ते ११ वी चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती होले यांनी केले. तर आभार दादा राऊत यांनी मानले.
To Top