राजगड l तोरणा किल्ल्यावर राजे फाऊंडेशन कडून स्वच्छता : पायथ्यास वृक्षारोपण

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे ; मिनल कांबळे
तोरणा किल्ल्यावर राजे फाऊंडेशन कडून स्वच्छता करण्यात आली, व किल्ल्याच्या पायथ्यास वृक्ष रोपण करण्यात आले,
राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित किल्ले संवर्धन व वृक्ष रोपण मोहिम घेण्यात आली किल्ले तोरणावरील
महादरवाजा आहे तो परिसर साफसफाई करण्यात आला व त्या बुरुजावरती वाढलेले गवत साफ करण्यात आले. तेथे गोळा झालेले शेवाळे हे साफ करण्यात आले. शिवकालीन काळात पाण्याचा निचरा होण्यासाठी जे आउटलेट होते ते पावसामुळे दगड माती ढासळून बुजले होते ते खुले करण्यात आले. तेथे पडझड झाली होती ते दगडी उचलण्यात आले. पाण्याचे  तलावांची स्वच्छता करण्यात आली. प्रशासनातर्फे गड चढताना जे रेलिंग लावण्यात आलेले आहे ते रेलिंग बहुतांशी ठिकाणी ढिले झालेले आहेत ते रेलिंग फिट करण्यात आले तसेच झुंजार माची येथे जाणारी जी शिडी आहे आणि जो रोप लावण्यात आलेला आहे ती शिडी व तो रोप फिट करण्यात आला व त्या जागेवरील शेवाळे साफ करण्यात आले तेथे उतरताना जे गवत वाढलेले होते ते गवत साफसफाई करण्यात आले. बुधला माची व हत्तीचा बुरुज येथील वाढलेले गवत आणि शेवाळे साफ करण्यात आले तेथे पाण्याचा निचरा होत नव्हता पाणी एका जागी साचून होते त्याला आउटलेट काढण्यात आला. लकडखाना परिसर साफ करण्यात आला तेथे कचरा उचलून एका जागी डम्पिंग केला.मेंगाई देवीचे मंदिर साफ करण्यात आले.
किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे गाव परिसरात आणि वनविभागाच्या कार्यालया जवळ जवळपास ५० झाडे लावण्यात आली. त्यात प्रामुख्याने फळझाडे , फुलझाडे वटवृक्ष व औषधी वनस्पती यांचा समावेश होता. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वेल्हे श्री गोविंद लंगोटे  ,वनपाल वैशाली हाडवळे , वनरक्षक सारिका बैलुमे, भाग्यश्री जगताप स्वप्निल उंबरकर  यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सिद्धांत पिसाळ,  उपाध्यक्ष योषित नागावकर,मयुरेश पाटील,         सचिव रोहित अशोक पिसाळ, उपसचिव संतोष पवार   खजिनदार पंकज कोल्हे ,  उपखजिनदार अमित जाधव ,           अशोक कुडले , गजानन सावंत, प्रवीण पड्याल , सुदर्शन देसाई, प्रशांत गुप्ता ,महादेव जगदाळे, रवींद्र सडेकर, निलेश कांबळे, अनिकेत पवार  उपस्थित होते

To Top