राजगड l वेल्हे तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

Admin
3 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे ; मिनल कांबळे
वेल्हे तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाकड्न  विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे, असे निवेदन तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले आहे अशी माहिती समन्वयक विलास पांगारे यांनी दिली. 
          या निवेदनात असे म्हटले आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अखिल मराठा समाजाच्या वतीने कुणबी दाखले मिळणेसाठी व मराठा समाजाला इतर मागास वर्गातुन आरक्षण मिळणे साठी आमचे समाजाचे संघर्ष योद्धा  मनोज जरागे पाटिल संपुर्ण महाराष्ट्रभर उपोषण व आंदोलन करत असुन त्यांचे आदेशानुसार  वेल्हे राजगड तालुक्यात अंदोलन व उपोषन केले होते , तत्कालीन तहसिलदार यांनी काही ठोक आश्वासने दिली होते त्या आश्वासनाची पुर्तता अदयाप झालेली दिसत नाही.
तसेच महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढला कि संपुर्ण महाराष्ट्रातील तहसिल कार्यालयातील भुमीअभिलेख कार्यालयातील दुयंम निबंधक कार्यालयातील व जुन्या प्राथमिक शाळेतील जुने दस्ताऐवज तपासुन जन्म मृत्यु रजिस्टर व इतर सर्व मोडी लिपीतील दस्तऐवज नोंदी तपासुन त्यांचे रूपांतरण मराठी भाषेत करावे त्या सर्व नोंदी कुणबी कु.कुण अश्या पद्धतीच्या असल्याने त्याचे भाषांतर करून कुणवी दाखले दयावेत व ति जबाबदारी  महसुल   कार्यालयात सोपविले होती त्या आदेशाने  राजगड तालुक्यात जुन्या दस्तनोंदी शोधणे व भाषांतर करण्याचे काम सुरू करणेत आले होते.  राजगड तालुक्यात एकुण गावे १२८ असुन त्या १२८ गावांपैकी फक्त ५६ गावातील तहसिल रेकॉर्डरूम मधील गाव नमुना नं.१४ चा शोध घेऊन भाषांतर करून मराठयांच्या तोंडाला पाने पुसले आहेत व उर्वरीत ७२ गावे असुन शोधने प्रलंबित आहे . त्या मुळे मोडी वाचन करणारे मोडी वाचक जादा पैसे घेऊन मराठा समाजातील फसवणुक व पिळवणुक करताना दिसत आहे या बाबत तहसील कार्यालयाकडून दुर्लक्ष झालेले आहे तसेच महाईसेवा केंद्र सेतुकेंद्र शासन दरा पैक्षा अवाचेसव्वा जास्त पैशाची आकारणी करून पैश्याची लुबाडनुक करत आहेत
याबाबत महसूल विभागाकडे लेखी स्वरूपात तकार केली होती त्या कडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. ही वाव अतीशय गंभीर आहे. या सर्व गोष्टींचा सारामार विचार करीता महसुल कार्यालय मराठा समाजाच्या भावणांकडे व मागाण्यांकडे काना डोळा करत आहे 
मराठा समाज बांधवांचे शैक्षणिक सामाजिक आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व गोष्टींकडे आपले लक्ष वेधन्या करीता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले, वेल्ह्याचे माजी उपसरपंच रुपेश पवार व राजगड तालुका मराठी क्रांती मोर्चा चे समन्वयक विलास पांगारे व  हे उपोषणास बसले आहेत तर दररोज वेगवेगळ्या गावातून मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते पदाधिकारी उपोषणास बसणार आहेत अशी माहिती समन्वयक विलास पांगारे यांनी दिली
To Top