सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर- मांढरदेवी रस्त्याच्या नवीन कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेला( आंबाडखिंड )घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा याचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे भोर - राजगड - मुळशी विधानसभा प्रमुख किरण दगडे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
सहा महिन्यांपासून भोर मांढरदेवी मार्गावरील आंबाडखिंड घाट रस्ता बंद केल्यामुळे स्थानिक प्रवासी वाहतूक व्यवसाय, हॉटेल व्यवसाय ठप्प झाले आहेत.परिणामी हॉटेल व्यवसायिक तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवार उपासमारीची वेळ आली आसल्याने तात्काळ घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा.तर एकेरी वाहतूक सुरू ठेवावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमर बुदगुडे, संतोष शिवतरे, अनंता सावले, बापू किंद्रे आदिंसह प्रवासी वाहनचालक उपस्थित होते.