सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुणे पंढरपूर मार्गावर निरा नाजिक पिंपरे येथे मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नीरा पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दि. २७ रोजी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास मंगेश रमेश पवार (वय २५) रा. थोपटेवाडी ता. पुरंदर हा त्याच्या गाडीवरून जात असताना एसटी बस क्रमांक एम एच १३ सी यु ७९६ आणि त्याची मोटरसायकल एम एच ११ बीटी ३३४९ यांच्यामध्ये धडक होऊन तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादसदम्यान मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत आहेत.
COMMENTS