Phaltan News l जयंत ढावरे राज्यकर सहआयुक्त जीएसटी पदी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद, ; प्रतिनिधी
पाडेगाव ता. फलटण येथील जयंत मधुकर ढावरे यांची कल्याण याठिकाणी राज्यकर सहआयुक्त Joint Commissioner Of State Tax (GST) पदी बढती झाली असून त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीयांसह पाडेगावकरांकडून आनंद व्यक्त होत आहे.
          जयंत ढावरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडेगाव व नीरा येथील प्राथमिक शाळेत झाल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद ज्युनिअर कॉलेज याठिकाणी झाले. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ पुणे येथून कृषि पदवी प्राप्त करुन स्पर्धा परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात राज्यकर अधिकारी वर्ग १ हे पद प्राप्त केल्यानंतर आपल्या मेहनतीवर बढती मिळवत राज्यकर सहआयुक्त जीएसटी पदापर्यंत मजल मारली आहे.
To Top