Purandar News l नीरा येथील नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह पाच दिवसानंतर सापडला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे 
दि. २६ रोजी निरा येथील सचिन बापूराव गोरे वय ३० रा. नीरा वर्ल्ड नंबर ३ येथील तरुणाने नीरा नदीमध्ये ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारली होती. पाच दिवसांनंतर त्याचा आज मृतदेह कांबळेश्वर येथे आढळून आला. 
        नीरा खोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने खोऱ्यातील चारही धरणे तुडुंब भरली होती यामुळे या चारही धरणातून मोठ्या प्रमाणात नीरा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात येत होता यातच निरा येथील सचिन गोरे वय ३० या तरुणाने नीरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलावरून सायंकाळी पाचच्या सुमारास उडी मारली होती यावेळी नीर नदीमध्ये सुमारे ४५ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी येत होते नीरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. 
          निरा नदीमध्ये उडी मारल्या पासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते बेपत्ता तरुण सापडत नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबीय देखील हवालदिल झाले होते नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याकारणाने उडी मारलेल्या युवकाचा शोध घेऊनही तो सापडत नव्हता परंतु अखेर चार दिवसानंतर या बेपत्ता तरुणाचा मृतदेह कांबळेश्वर ता.  फलटण येथील बंधाऱ्या नजीक नीरा नदीच्या कडेला तरंगताना दिसला निरा येथील काही युवक व कांबळेश्वर मधील ग्रामस्थांनी या तरुणाचा मृतदेह अखेर नीरा नदी पात्रातून बाहेर काढला.
To Top