Wai Breaking l वाई पोलीसांची मोठी कारवाई : १० लाख ६२ हजारांचा गांजा जप्त : पोलिसांनी सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळ्या

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
दिनांक २८/०८/२०२४ रोजी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना त्यांच्या गोपनीय
बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, ईस्माइल आदिल ईनामदार रा फुलेनगर ता वाई जि सातारा हा शहाबाग फाटा वाई ता वाई जि सातारा येथे त्याच्या मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये चोरुन बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री करीत आहे. 
        अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरबाबत पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांची परवानगी घेऊन सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने गुन्हेप्रकटीकरण पथकासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचुन छापा मारला असता सदर ठिकाणी इसम नामे ईस्माइल अदिल ईनामदार वय ३१ रा. फुलेनगर वाई हा मिळुन आला त्यानंतर सदर इसमाचे पत्र्याचे शेडचे कसुन झडती घेतली असता, लोखंडी कॉटचे खाली तीन प्लास्टिकची पोती दिसली त्यातुन उग्र वास येत असल्याने ती बाहेर काढुन उघडुन पाहिले असता, त्यामध्ये गांजासदृश्य वनस्पती मिळुन आल्याने सदरचा गांजा हा कशाकरिता आणला आहे याबाबत ईस्माइल ईनामदार याचेकडे विचारणा केली असता, सदरचा गांजा हा चोरुन विक्री करीता आणला असल्याचे त्याने सांगितले. 
              सदरचा गांजा हा सुमारे १०,६२,२५०/- रुपये किंमतीचे ४२.५०० किलोग्रॅम वजन असलेला होता. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे.
       सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जितेंद्र शहाणे, सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो. हवा विजय शिर्के, पो. हवा अजित जाधव, पो. कॉ प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ नितीन कदम, म.पो.कॉ श्वेता गायकवाड पो. कॉ हेमंत शिंदे, पो. कॉ श्रावण राठोड, पो. कॉ विशाल शिंदे, पो. कॉ प्रेमजित शिर्के यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल गवळी करीत आहेत पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.
To Top