Baramati Breaking l कोऱ्हाळे येथील २२ वर्षीय युवकाची वाघळवाडी येथील वनविभागात झाडाला गळफास घेत आत्महत्या

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी( ता. बारामती) येथील वनविभाग हद्दीत (रा. कोऱ्हाळे २२ फाटा ता. बारामती ) येथील अजित नंदकुमार ठोंबरे वय २२ वर्ष या युवकाने बुधवारी (दि. ११) रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान वाघळवाडी येथील वनविभागातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नसून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत.
To Top