Baramati News l विविध स्पर्धांचे आयोजन करत निंबुत येथील गणेश मंडळांचा महिलांच्या कलागुणांना वाव : बुवासाहेब नगरचा राजा मित्रमंडळ व श्री राजहंस तरुण मित्र मंडळाचा उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
निंबुत (ता.बारामती ) येथील बुवासाहेब नगरचा राजा मित्र मंडळ निंबुत वार्ड क्र.१ व श्री.राजहंस तरुण मित्र मंडळ जगतापवस्ती   या मंडळांनी विविध स्पर्धेचे आयोजित करून महिलांच्या कलागुणांना वाव दिला.विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्यांना बक्षिसे देण्यात आली.
                निंबुत येथील श्री. राजहंस तरुण मित्र मंडळ, जगतापवस्ती यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रविवारी ( दि.१५) स्वादिष्ट पदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान गटामध्ये आठवी ते बारावी पर्यंतच्या मुली, मोठ्या गटासाठी अट नाही. या स्पर्धेचे आयोजन केले होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून निशा गिरीश काकडे , सारिका दीपक काकडे, स्मिता राजेश काकडे होत्या. तर परीक्षक म्हणून तेजश्री विराज काकडे, समिक्षा धैर्यशील काकडे होत्या.तर राजेश काकडे (उपसरपंच निरा )विजय काकडे , राजेंद्र काकडे, उदय काकडे  यांची विशेष उपस्थिती होती.
            या स्पर्धेत तीस महिलांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्थेत प्रथम क्रमांक - जयश्री लालासो काकडे , द्वितीय क्रमांक - संगिता प्रकाश भेस्के, तृतीय क्रमांक - सायली यशवंत जगताप, चतुर्थ क्रमांक - रूपाली अजय भेस्के, पाचवा क्रमांक - काव्या धनंजय रनवरे व सारिका यशवंत जगताप या महिला विजेत्या ठरल्या. विजेत्या महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. 
      श्री. राजहंस तरुण मित्र मंडळाचे‌ सर्व तरूण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.
बुवासाहेब नगरचा राजा मित्र मंडळ निंबुत वार्ड क्र.१ येथील मंडळाने संगीत खुर्ची , रस्सीखेच, तळ्यात मळ्यात , होम मिनिस्टर अशा विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत मुली व महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र उर्फ बाबू रनवरे , उपाध्यक्ष ,सोमनाथ पवार , खजिनदार शंभूराजे काकडे,  तसेच मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ता उपस्थित‌ होते.
To Top